बापरे! पत्नीचा संशयास्पद मृत्यू, पतीनेही प्राशन केले विष

103

पत्नीचा घरात संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर, पतीनेही विष घेतल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकाेली तालुक्यातील पळसपाणी येथे उघडकीस आली आहे. पतीची प्रकृती चिंताजनक असून, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. पपिता चरणदास राऊत (32) असे मृत पत्नीचे नाव असून चरणदास राऊत (42) असे पतीचे नाव आहे.

पत्नी मृत घोषीत

चरणदासची आई मधल्या खाेलीत गेली असता, तिला पपिता चटईवर झाेपलेल्या अवस्थेत दिसली. मात्र, आवाज देऊनही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आरडाओरडा केला. ताेपर्यंत चरणदास मात्र घरुन निघून दूर गेला हाेता. पाेलीस पाटलाच्या सहाय्याने पपिताला साकाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी तपासाताच मृत घाेषित केले आहे.

( हेही वाचा मलिकांच्या अडचणीत वाढ! कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड येथे ईडीचे ‘सर्च ऑपरेशन’ )

अद्यापही कारण अस्पष्ट

इकडे घरच्या मंडळींनी चरणदासचा शाेध सुरु केला असता, त्याने विष प्राशन केल्याचे आढळून आले. उशिरा त्याला साकाेलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अद्यापही पत्नीच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे आले नाही. त्यामुळे साकोली पाेलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.