पिस्तुल घेण्यासाठी त्याने विकली मालकाची मोटार

पुण्याहून मुंबईत मालकाला घेऊन आलेल्या वाहनचालकाने पिस्तुल आणि काडतुसे खरेदी करण्यासाठी मालकाची मोटार विकल्याचा प्रकार समोर आला आहे, पोलिसांनी सातारा येथून विकलेली मोटार ताब्यात घेऊन वाहन चालकाला अटक केली आहे. त्याच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली, हा व्यक्ती मोटार विकून आलेल्या पैशातून विकत घेतलेल्या पिस्तुलने मेव्हण्याची हत्या करणार होता.

( हेही वाचा : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : मविआची साथच तारु शकेल शिवसेनेला)

मुंबईत नेहमी येणारे पुण्यातील व्यावसायिक नेहमीप्रमाणे आपल्या खाजगी एसयूव्ही या मोटारीने गेल्या महिन्यात मुंबईतील नरिमन पॉईंट येथे आले होते. चालकाला त्यांनी मोटार पार्क करून थांबण्यास सांगितले व मित्राला भेटायला निघून गेले. काही वेळाने ते परत आले असता त्यांना जागेवर मोटार आणि चालक दोघेही आढळून आले नाही, त्यांनी चालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन बंद असल्यामुळे लागत नसल्यामुळे त्यांनी अखेर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोटारीचा शोध घेत घेण्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या टोल नाक्यावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासले असता मोटार पुण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मोटार आणि चालकाचा शोध घेत असताना ही मोटार सातारा जिल्ह्यातील पाटण पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांना मिळाली. मरीन ड्राईव्हचे पोलीस पथक पाटण येथे रवाना झाले व त्यांनी चौकशी केली असता पाटण पोलिसांनी चार जणांना अटक केली होती व त्यांच्याकडे शस्त्र सापडली होती.

सध्या हे आरोपी येरवडा तुरुंगात असून मरीन ड्राईव्ह पोलीस ज्याचा शोध घेत होते त्याला जामीन मिळून तो बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी येरवडा तुरुंगात जाऊन त्याच्या साथीदारांकडे चौकशी केली असता त्याचा गावचा पत्ता पोलिसांना सापडला, पोलिसांनी त्याच्या गावी जाऊन त्याचा शोध घेऊन त्याला अटक करून मुंबईत आणले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने मालकाची मोटार विकून त्यातून एक पिस्तुल आणि दोन काडतुसे विकत घेतली होती, या पिस्तुलने तो त्याचा मेव्हण्याची (बहिणीचा पती) हत्या करणार होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली, त्याच्या बहिणीसोबत त्याच्याच मित्राने खोटं बोलून लग्न केले होते व ते लग्न त्याला मान्य नसल्यामुळे तो त्याच्या बहिणीच्या पतीची हत्या करणार होता असे तपासात समोर आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here