नागपूर पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये घरफोडी करणा-या एका हायटेक टोळीला अटक केली आहे. ही टोळी महागड्या कार आणि वाॅकी- टाॅकी वापरुन घरफोड्या करत होती. या टोळीने 26 जून रोजी नागपुरात चार-पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. या टोळीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.
नागपुरात झालेल्या घरफोडीचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करताना, आरोपी कारमध्ये बसून दुस-या राज्यात गेल्याचे पोलिसांना समजले. ही टोळी इतर राज्यांत जाताना कारचा नंबर बदलत होती. यानंतर पोलिसांनी या कारचा शोध सुरु केला. त्यावेळी ही टोळी शनिवारी दुपारी काटोल नाक्यावरुन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून टोळीला अटक केली. या टोळीचा म्होरक्या मध्यप्रदेशातील भोपाळ येथील 36 वर्षीय अनुप सिंग आहे. सुमारे सात वर्षांपासून तो ही टोळी चालवत होता.
( हेही वाचा: शरद पवारांचं ‘झूठ बोले कौआ काटे’; औरंगाबाद नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक )
या आरोपींकडून पोलिसांनी वाॅकी-टाॅकी, कुलूप तोडण्याची उपकरणे, नंबर प्लेट असा 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community