उपनगरातील अंधेरी पूर्व येथील एका तीन तारांकित हॉटेलच्या किचनमध्ये वेटर आणि कुक यांच्यात जोरदार भांडण झाले, या भांडणात कुकने (स्वयंपाकी) वेटरवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटमेमुळे हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी कुक विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जगदीश रामसिंग जलाल (४२) असे हत्या करण्यात आलेल्या वेटरचे नाव आहे. जगदीश हा मूळचा उत्तराखंड येथे राहणारा असून मागील काही वर्षांपासून अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील तीन तारांकित हॉटेल रेसिडेंसी मध्ये वेटर म्हणून नोकरीला होता. तर माधव मंडल (२७) हा कुक (स्वयंपाकी) म्हणून किचन मध्ये काम करीत होता.
चाकूने वार करून हत्या
गुरुवारी दोघे रात्रपाळीला होते, रात्री हॉटेल मध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकाने वेटर जगदीशला एका डिशची ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर जगडीशने कुक माधव याला बनवायला सांगितली. परंतु माधव याने डिश बनविण्यास उशीर केल्यामुळे ग्राहक नाराज होऊन गेल्यामुळे जगदीशने माधवला जबाबदार धरले, यावरून दोघात रात्री भांडण झाली. दुसऱ्या दिवशी दोघे सकाळी ११ वाजता पुन्हा भांडण झाले, या भांडणात माधव याने किचन मधील चाकूने जगदीश यांच्यावर वार करून त्याची हत्या केली.
( हेही वाचा : खड्डयांसाठी चार तंत्रज्ञानानांचे रस्त्यांवर प्रात्यक्षिक : कोणते तंत्र ठरणार यशस्वी )
ग्राहकाने दिलेल्या ऑर्डर प्रमाणे आरोपी कुक याने जेवणाची डिश बनवून दिली नसल्यामुळे ग्राहक वेटरवर नाराज झाले होते, व त्याने याची तक्रार मॅनेजरला केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून माधव मंडल याला अटक करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community