धक्कादायक! पोलिसाने स्वत:वर गोळी झाडत केली आत्महत्या

160

लातूर जिल्ह्यातून एका पोलिसाने स्वत:लाच गोळ्या झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरमधील किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचा-याने शनिवारी रात्री स्वत: ला गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

म्हणून आत्महत्या केली असावी

किल्लारी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी साहेब सावंत ( वय 38 ) यांनी मध्यरात्री स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली. काही दिवसांपासून ते पैशांच्या देवाण-घेवाणीच्या मानसिक त्रासातून जात होते. त्यातूनच ही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. साहेब सावंत हे कासार शिर्शी येथे असताना, त्यांनी काही प्लॉट घेतले होते. यातून काही आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहारातून आर्थिक वाद निर्माण झाले असल्याचे म्हटले जात होते. त्यांची नेमणूक किल्लारी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

( हेही वाचा: कामाठीपुरातील ‘त्या’ महिलांची अशीही दखल! )

पडताळणी सुरु

घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगले किल्लारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयत पाठवण्यात आला. या घटनेची माहिती सकाळच्या वेळी समजताच किल्लारी आणि परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. आत्महत्येपूर्वी  चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली आहे. त्याची सत्यता पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.