दिल्ली पोलिसांच्या छापेमारीत खालिस्तानी दहशतवाद्यांना अटक; घरातून हातबॉम्ब जप्त

दिल्लीच्या जहांगीरपुरी येथून दोन संशयित खालिस्तान- समर्थित दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच भालस्वा डेअरी परिसरात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने छापा टाकला आहे. या छाप्यात एका घरातून हातबाॅम्ब सापडले आहेत. जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या जगजीत उर्फ जस्सा आणि नौशाद यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकण्यात आला. या आरोपींची दिल्ली पोलीस चौकशी करत आहेत. जगजीत उर्फ जस्सा उर्फ याकूब उर्फ कप्तान, रहिवासी उधम सिंह नगर, उत्तराखंड आणि नौशाद, रहिवासी जहांगीरपुरी यांनी 14 दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

( हेही वाचा: धक्कादायक: पुण्यातील मुंढव्यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या )

दहशतवाद्यांनी हत्या केल्याचा  पोलिसांना संशय

तपासादरम्यान, दोन्ही आरोपींनी शुक्रवारी रात्री स्पेशल सेलच्या पथकाला ठाणे भालस्व डेअरी अंतर्गत श्रद्धानंद काॅलनीतील त्यांच्या भाड्याच्या घरात नेले. खोलीची झडती घेतली असता तेथून दोन हातबाॅम्ब सापडले आहेत. या दोन आरोपींनी या खोलीत कोणाची तरी हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, अद्याप मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here