कांदिवलीत चार तरुणांवर गोळीबार; एका तरुणाचा मृत्यू

96

मुंबईमधील कांदिवली येथे चार तरुणांवर शुक्रवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दहीहंडीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बाईकवरुन आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायरिंग केले. ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर 3 तरुण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु 

या भागातील माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी गोळी झाडणारी व्यक्ती आणि घटनेतील पीडित व्यक्ती एकमेकांना ओळखत असल्याचे सांगितले. गोळीबाराच्या चार राऊंडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अंकित यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनास दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी उर्वरित तीन जखमी तरुणांची नावे आहेत. दहीहंडीच्या वादातून ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप या घटनेमागचे कारण समोर आलेले नाही. शुक्रवारी 12.15 च्या दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

( हेही वाचा: ठाकरे गटाला लागली गळती आणि एकनाथ शिंदेंची चलती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.