महिलांचे अश्लिल व्हिडीओ बनवून करत होता ब्लॅकमेल; मुंबई पोलिसांकडून 19 वर्षीय तरुणाला बेड्या

मुंबई आणि इतर भागातील 21 हून अधिक महिलांचे अश्लिल व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधील एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. प्रशांत आदित्य असे या तरुणाचे नाव आहे. गुजरातच्या गांधीनगरमध्ये बसून देशातील अनेक भागातील महिलांना ब्लॅकमेल करुन तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता. महिलांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील छायाचित्रांचा वापर अश्लील क्लिप बनवण्यासाठी करत होता. नंतर ती क्लिप डिलीट करण्यासाठी पैसे उकळत असे.

असा करायचा प्रशांत आदित्य ब्लॅकमेलिंग

प्रशांत आदित्य इन्स्टाग्रामवर कम्युनिटीमध्ये अॅड होता. इन्स्टाग्रामवर या कम्युनिटीमध्ये ज्या महिलांचे फोटो असायचे त्याच्या बॅकग्राऊंडला प्रशांत पाॅर्न फिल्मचा साऊंड लावायचा. मग त्या महिलांना हा व्हिडीओ किंवा फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देत असे. व्हिडीओ व्हायरल करु नये यासाठी तो महिलांकडून 500 ते 1000, 5000 रुपयांची मागणी करायचा अशाप्रकारे तो अनेक महिलांना ब्लॅकमेल करायचा.  प्रशांत आदित्य हा दहावी नापास आहे.

( हेही वाचा: ‘24 तासांत ट्वीट डिलीट करा’, स्मृती इराणींच्या मुलीवर आरोप करणा-या काँग्रेस नेत्यांना न्यायालयाने फटकारले )

पोलिसांचे आवाहन

अशा लोकांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने 21 महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. परंतु चौकशीत त्याने हा आकडा 50 पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. प्रशांत आदित्यचे हे जाळे केवळ एका राज्यात नाही, तर संपूर्ण देशात पसरले होते.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here