मुंबई पोलिसांनी 36 तासांत शोधून काढला हरवलेला मोबाईल

155

टॅक्सीमध्ये विसरलेला 40 हजारांचा मोबाईल साडे चार तास अथक मेहनत घेत, 36 तासांत मोबाईल शोधून काढून संबंधित व्यक्तीला परत देण्याची कामगिरी मुंबईतील L.T मार्ग पोलिसांनी केली आहे. 1 ऑगस्टला सोमवारी दुपारी 4 वाजता अथर्व आयुर्वेदिक क्लिनिकचे डाॅक्टर सुयोग कुळकर्णी हे प्रींसेस स्ट्रीट वर्धमान चौक येथे टॅक्सीत आपला 40 हजारांचा मोबाईल विसरले. डाॅक्टर कुळकर्णी यांनी लक्षात येताच लगेच पोलीस ठाणे गाठले.  L.T मार्ग पोलिसांनी साडे चार तास अथक मेहनत घेत सीसीटीव्ही तपासून, टॅक्सी ड्रायव्हरचा शोध घेतला आणि 40 हजारांचा मोबाईल कुळकर्णी यांच्याकडे सुपुर्द केला.

अशी घडली घटना

मुंबईचे रहिवासी डाॅक्टर सुयोग कुळकर्णी हे आपला 40 हजारांचा मोबाईल फोन वर्धमान चौक येथे टॅक्सीमध्ये विसरले. क्षणातच त्यांच्या हे लक्षात आले. काय करावं त्यांना सुचेना. त्यांनी आपल्या फोनवर असंख्य काॅल्स केले परंतु टॅक्सी ड्रायव्हरने त्यांचा एकही काॅल उचलला नाही. शेवटी त्यांनी जवळचे L.T मार्ग पोलीस ठाणे गाठले.

( हेही वाचा: ४० महिलांना लग्नाचे आमिष दाखवून केली आर्थिक फसवणूक; अखेर पोलिसांकडून अटक )

पोलिसांनी असा शोधला मोबाईल

L.T मार्ग पोलिसांनी थोडाही वेळ न दवडता सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. तसेच, डाॅक्टर कुळकर्णी यांना पोलिसांनी धीर दिला. मुंबईच्या रस्त्यांवर एक विशिष्ट टॅक्सी शोधणे हे गवताच्या गंजीतील सुई शोधण्याहूनही कठीण काम आहे. परंतु, L.T मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस इन्सपेक्टर सर्वश्री साटम , कांबळे, खांडेकर आणि गुजर यांनी साडे चार तास अथक मेहनत घेत CCTV फूटेज तपासले. अक्षरशः हजारो सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी डोळ्याखालून घातले. पोलीस इन्सपेक्टर गुजर यांची तीक्ष्ण नजर आणि निरीक्षण शक्तीने टॅक्सी शोधून काढली. टॅक्सीचा नंबर दिसला. त्या registration number वरून ड्रायव्हरचे डिटेल्स काढण्यात आले. त्याला फोन केला गेला. त्याला फोनवरून पोलिसांनी समजावले. दुसऱ्याच दिवशी तो टॅक्सी ड्रायव्हर कुळकर्णी यांचा फोन घेऊन पोलीस ठाण्यात हजर झाला. हा सर्व तपास सुरु असताना, L.T मार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी डाॅक्टर कुळकर्णी यांना धीर दिला. L.T. मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी खांडेकर, पोलीस अधिकारी गुजर यांनी अथक मेहनत घेत, कुळकर्णी यांना त्यांचा मोबाईल परत मिळवून दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.