ओडिशाचा उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी गांजा तस्करी विरोधातील शोधमोहिमेदरम्यान, गंजाम जिल्ह्यातून 1.22 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम व 24 सोन्याची बिस्किटे जप्त केली. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या दशरथ शौकर या व्यक्तीकडे बेहिशेबी रक्कम व आनंद सुबुधी या सराफाकडून 2.20 किलो वजनाची सोन्याची बिस्किटे आढळून आली.
ब्रम्हपूरचे पोलीस अधिक्षक विवेक एम. यांनी सांगितले की, इतकी मोठी रक्कम तसेच, सोन्याची बिस्किटे कुठून आणली याची माहिती शौकर आनंद सुबुधी हे दोघेही देऊ शकले नाहीत. जप्त मुद्देमाल आयकर खात्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या दोघांकडील पैसा व सोने यांचा स्त्रोत शोधणे सुरु आहे.
( हेही वाचा: माटुंगा, मुंबादेवी येथील वाहनतळांच्या निविदांना लागणार ब्रेक! )
Join Our WhatsApp Community