पुण्यात कोयत्याने हल्ले करण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कात्रज भागात ही घटना घडली असून अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते बघून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
( हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय! २१ देशांच्या नेत्यांना मागे टाकत, ग्लोबल लीडर्सच्या यादीत अव्वल)
अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल
कात्रज भागात कोयत्याने एका तरुणावर वार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशाल धुळे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या ३ मुलांचे वय १५ वर्षे आहे.
या अल्पवयीन मुलांचा विशालशी शुल्लक गोष्टीमुळे वाद झाला होता. याचा राग मनात ठेऊन या मुलांनी विशालवर हल्ला करायचे ठरवले. विशाल कात्रज भागातून जात असताना या तिघांनी येऊन त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने वार केले व तिथून पळ काढला अशी माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community