पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौ-यापूर्वी पुण्यात ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान, रविवारी पुणे पोलिसांच्या हाती जिवंत काडतुसे लागली. पर्वती भागातील एका भंगाराच्या व्यापा-याकडून तब्बल 1 हजार 105 गोळ्या जप्त केल्या असून, त्यातील 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे, 970 बुलेट असे जवळपास 1 लाख 57 हजरांचे घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी भंगार व्यापा-याला अटक करण्यात आली आहे. दिनेशकुमार कल्लुसिंग सरोज असे अटक करण्यात आलेल्या व्यापा-याचे नाव असून त्याला सोमवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
( हेही वाचा: आमदार देवेंद्र भुयार ‘प्रामाणिक’ ते खरं बोलताहेत; संजय राऊतांचे मोठे विधान )
जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या ताब्यात असणा-या व्यावसायिकाकडून तब्बल दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी पेठेतील गौरी अली येथे एका भंगार विक्रेत्याने त्याच्या दुकानात बंदुकीची काडतुसे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, छापा टाकून एकूण 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे आणि 970 बुलेट शिसे असा एकूण 1.56 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.