Radheshyam Sharma : गुजराती साहित्यासाठी भरीव योगदान देणारे समीक्षक राधेश्याम शर्मा

Radheshyam Sharma : फेरो आणि स्वप्नतीर्थ ह्या दोन कादंबर्‍या राधेश्याम शर्मा यांनी लिहिल्या. त्याचबरोबर आंसू अने चंदर्नू हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

183
Radheshyam Sharma : गुजराती साहित्यासाठी भरीव योगदान देणारे समीक्षक राधेश्याम शर्मा
Radheshyam Sharma : गुजराती साहित्यासाठी भरीव योगदान देणारे समीक्षक राधेश्याम शर्मा

राधेश्याम शर्मा यांचा जन्म ५ जानेवारी १९३६ रोजी गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील वावोळ या गावात झाला. (Radheshyam Sharma) त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर गुजरातमधील रुपल गावातले. ते परंपरेने पुरोहित होते. त्यांनी १९५७ मध्ये गुजरात कॉलेजमधून गुजराती आणि मानसशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी पूर्ण केली आणि गुजरात युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये (Gujarat University School of Languages) मास्टर ऑफ आर्ट्सचे शिक्षण घेतले. पण काही कारणामुळे ते परीक्षा देऊ शकले नाहीत.

(हेही वाचा – Ministry Clerk Typists : मंत्रालय लिपिक टंकलेखक यांना दरमहा पाच हजारांचा भत्ता)

सुरुवातीच्या काळात आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल देत १९६५ ते १९८३ दरम्यान ते प्रवचन देऊ लागले. त्यांची पहिली लघुकथा “बदसूरत” (Badsurat) ही होती. शर्मा यांनी लघुकथांसाठी अतिशय वेगळ्या विषयाची मांडणी केली. बिचारा हा त्यांचा पहिला लघुकथा संग्रह १९६९ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर पावनपावडी (Pawanpapadi), राधेश्याम शर्मा नी श्रेष्ठ वार्ताओ, वार्तावरण, पहला पत्थर कौन मारेगा, घटनालोक असे अनेक संग्रह प्रकाशित झाले.

फेरो आणि स्वप्नतीर्थ ह्या दोन कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. त्याचबरोबर आंसू अने चंदर्नू हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. वचन, गुजराती नवलकथा, कवितानी कला इत्यादी समीक्षणे त्यांनी लिहिली. राधेश्याम शर्मा यांना १९८७ मध्ये वार्तावरण या लघुकथा संग्रहासाठी त्यांनी समीक्षक पुरस्कार पटकावला. १९९८ मध्ये अनंतराय रावल पुरस्कार (Anantarai Rawal Award), १९९९ मध्ये अशोक हर्ष पुरस्कार (Ashok Harsh Award) आणि २००० मध्ये चंदुलाल सेलारका पुरस्कार (Chandulal Selarka Award) प्राप्त झाले आहेत. २००४ मध्ये रणजीतराम सुवर्ण चंद्रक आणि २०१२ मध्ये कुमार सुवर्ण चंद्रक प्राप्त झाले आहेत. (Radheshyam Sharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.