एनआयए आणि ईडीने गुरुवारी देशातील 15 राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयांवर धाडी टाकल्या होत्या. यात विदेशी फंडिंगबाबत मोठा खुलासा झालाय. आखाती देशांमधून पीएफआयला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे .
तपास यंत्रणांच्या अहवालानुसार, पीएफआयला दर महिन्याला 3 मिलियन दिरहम म्हणजे सुमारे 67 कोटी रुपये एकट्या युएई आणि अरब देशांमधून दिले जातात. एनआयए आणि ईडीच्या तपासात आखाती देशांना पीएफआयशी जोडलेल्या अनेक मेन पावर सप्लाय कंपन्यांची माहिती मिळाली आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमधून या कंपन्यांद्वारे आखाती देशांमध्ये कामासाठी गेलेले हजारो लोक दर महिन्याला पीएफआयला निधी देतात. कधीकधी पीएफआयला हवालाद्वारेही निधी मिळतो.
(हेही वाचा – “उरलेले दोनचार जणांना टिकवा, नाही तर…”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला)
तपास यंत्रणांमधीलएका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार युएई आणि अरब देशांमधील 30 हजारांहून अधिक पीएफआयचे सहानुभूतीदार अर्थ पुरवठा करतात. यामाध्यमातून पीएफआयला दर महिन्यात 3 दशलक्ष दिरहम निधी देतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआय पुस्तक प्रकाशन, मासिके आणि सीडीच्या माध्यमातून देखील कमाई करते. यासोबतच देशातील अनेक मशिदी आणि मदरशांमधूनही पीएफआयला निधी दिला जातो. केरळमधील काही स्वयंसेवी संस्थांचीही नावे तपासात समोर आली आहेत, ज्यांच्या माध्यमातून आखाती देशांतील पीएफआयला निधी दिला जातो. या सर्वांच्या मुसक्या आवळण्याची मोठी जबाबदारी तपास यंत्रणांवर आहे.
Join Our WhatsApp Community