काय सांगताय… आता ट्रेनसह एसी बसमध्ये कोरोनाचा धोका नसणार!

126

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याने घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. यासोबतच अत्यावश्यक कामासाठी सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना दोन डोस घेतले असतील तरच प्रवास करण्यास परवानगी दिली जात आहे. तर सार्वजनिक वाहनातून एकाच वेळी बरेच लोक प्रवास करत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. मात्र केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. त्यांनी असे जाहीर केले की, ते लवकरच ट्रेन आणि एसी बसमध्ये असे तंत्रज्ञान बसवणार आहेत, ज्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होणार नाही. सरकारने अशी माहिती दिली की त्याचे नवीन निर्जंतुकीकरण तंत्रज्ञान कोरोनाला हवेत पसरण्यापूर्वीच नष्ट करते. ट्रेन आणि एसी बसेसव्यतिरिक्त हे नवं उपकरण बंद ठिकाणीही बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा – किरिट सोमय्यांना दिलासा! न्यायालयानं फेटाळला मानहानीचा खटला)

सर्वसामान्यांसाठीही तंत्रज्ञान उपलब्ध होणार

सोमवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) लवकरच बंद जागेत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहे. निवडणूक आयोगाने रोड शो आणि रॅलींवर बंदी घातली असल्याने, विधानसभा निवडणुकीत मर्यादित क्षमतेसह बंद दरवाजाच्या सभांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच ते पुढे असेही म्हणाले की, या नवीन निर्जंतुकीकरण तंत्रज्ञानाची चाचणी रेल्वे कोच आणि एसी बस तसेच संसद भवनात करण्यात आली आहे. आता हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठीही उपलब्ध होणार आहे.

जंतूंचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त

मंत्रालयाने CSIR च्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIO) च्या माध्यमातून अल्ट्राव्हायोलेट-सी तंत्रज्ञान विकसित केल्याचा दावा मंत्र्यांनी केला. हवेतील कोविड-19 नष्ट करण्यात ते पूर्णपणे प्रभावी आहे. कोरोनानंतरच्या काळातही जंतूंचा नायनाट करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे तंत्र असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.