नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शुक्रवारी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET)-ग्रॅज्युएटचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत 19,865 उमेदवारांनी 30 विषयांत 100 टक्के गुण मिळवले आहेत. 8 हजारांहून अधिक उमेदवारांनी सर्वाधिक इंग्रजी विषयात 100 टक्के गुण मिळवले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन तपासू शकतात. CUET निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असणार आहे.
(हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द, आता ‘म्हाडा’ला सर्वाधिकार बहाल)
CUET (UG) 2022 Results declared. pic.twitter.com/OkSLNHT5yD
— National Testing Agency (@DG_NTA) September 15, 2022
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शैक्षणिक सत्र 2022-23 साठी सर्व केंद्रीय विद्यापीठांमधील सर्व पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी CUET-UG आयोजित केले होते. प्रवेश परीक्षा 15 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान देशभरातील 259 शहरांमध्ये आणि भारताबाहेरील 10 शहरांमध्ये सुमारे 490 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण 14,90,293 उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी 9,68,201 उमेदवार परीक्षेला बसले होते. चाचणी दिलेल्यांपैकी 5,38,965 पुरुष, 4,29,228 महिला आणि 8 तृतीय लिंगाचे होते.
त्यापैकी सर्वाधिक 8,236 उमेदवारांनी इंग्रजी विषयात 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्यानंतर 2,065 उमेदवारांनी राज्यशास्त्रात 100 पर्सेंटाइल तर 1,669 उमेदवारांनी बिझनेस स्टडीजमध्ये 100 पर्सेंटाइल मिळवले आहेत. याशिवाय जीवशास्त्रात 1324, अर्थशास्त्रात 1188 आणि मानसशास्त्रात 1209 जणांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
Join Our WhatsApp Community