नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमधील किनवट तालुक्यात तीन शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या शेतात थेट विनापरवाना बेकायदेशीर गांजाची लागवड केली आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. इतकेच नाही तर साधारण अडीच लाखांचा गांजा ताब्यात घेतला आहे.
(हेही वाचा – ऐन दिवाळीत पेट्रोल-डिझेल होणार महाग? कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ)
मिळालेल्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील चंद्रपूर येथील एका शिवारात तीन शेतकऱ्यांनी संगनमत करत विनापरवाना बेकायदेशीर गांजाची लागवड केली. कापसाच्या शेतात तिघांनीही गांजाची लागवड केली होती. यासंदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून तब्बल 52 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे.
किनवट तालुक्यातील चंद्रपूर शिवारातील तीन शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतीत चक्क गांजाची लागवड केली. शेतात बेकायदेशीरपणे एनडीपीएस कायद्याच्या भंग करत अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गस्तीव असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं चंद्रपूर शिवारातील कापसाच्या शेतावर कारवाई केली. या कारवाईमध्ये गुन्हे शाखेने शेतातील तब्बल 52 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची किंमत तब्बल दोन लाख 61 हजार चारशे रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.
Join Our WhatsApp Community