मार्च २०२५ पासून महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील लोककलावंतांना ‘आनंद सफर’ (Anand Safar) घडवून आणण्याचा आनंद फाऊंडेशनचा मानस आहे. ज्याद्वारे संस्कृतीची देवाण घेवाण आणि जतन केले जाईल. त्याचा शुभारंभ १५ मार्चला मराठवाड्यातील लोककलावंतांपासून होणार आहे. १६ मार्चला या आनंद सफरीची सांगता, ‘आनंद जागर उत्सव लोककलांचा’ या कार्यक्रमाद्वारे प्रतिभावान कलावंतांच्या लोककलेच्या प्रत्यक्ष सादरीकरणाने होणार आहे. संकल्पना डॉ. गणेश चंदनशिवे यांची आहे. अशा या अनोख्या कार्यक्रमाला दर्दी रसिकांनी उपस्थित राहून, कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि कलावंतांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आनंद फाऊंडेशनच्या स्वप्ना मयेकर यांनी केले आहे.
हा कार्यक्रम १६ मार्चला दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या दरम्यान दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथील सभागृहात होणार आहे. आनंद फाउंडेशन ही मुंबईतील एक अशी स्वयंसेवी संस्था आहे जी ग्रामीण महिलांना प्रवास आणि पर्यटनाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, त्यांचे मानसिक आरोग्य, नेतृत्व संधी व त्यांचा आनंद मिळविण्यासाठी मदत करते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील विविध गावांतील महिलांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेता स्वप्नातील शहर दाखवण्यासाठी मुंबईत आणतात. सामाजिक-आर्थिक घटकातील उपेक्षित, आदिवासी अशा महिलांवर लक्ष केंद्रित करतो. महिलांना त्यांच्या आत असलेल्या आनंदाची जाणीव करून देणे, त्यांना महिला सक्षमीकरण आणि महिला आरोग्य यांचे महत्व पटवून देणे. याची जाणीव करुन देणे हे या उपक्रमामागील उद्दिष्टे आहेत.
(हेही वाचा बिहारपासून हिंदू राष्ट्राच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू; Dhirendra Krishna Shastri यांचे महत्त्वाचे विधान)
या ‘आनंद सफर’च्या (Anand Safar) माध्यमातून मुंबई आणि आसपासची प्रमुख ठिकाणे त्यासंबंधित महत्वाची माहिती दिली जाते. या दौऱ्यात त्यांना मोकळेपणा, स्वातंत्र्य, समानता, प्रतिनिधित्व व इतर कौशल्ये आणि आनंद मिळावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्या गावापासून मुंबईतील दोन दिवस आणि परत गाव असा हा ३ दिवसांचा मुख्य उपक्रम आहे. गेल्या सहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे कार्य ही संस्था करत आहे. आतापर्यंत १२ पेक्षा जास्त जिल्हे आणि ४०० पेक्षा जास्त गावातील हजारो महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. या आनंद सफरीचा (Anand Safar) पाड्यांवर राहणारे आदिवासी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कचरा वेचक सेविका, सेक्स वर्कर्स अशा अनेकांनी लाभ घेतला आहे. आता प्रवासातून आनंद इतकेच मर्यादित न राहता, या संकल्पनेला अनेक नवीन आयाम प्राप्त होत चालले आहेत, असा हा ‘आनंद’ वृक्ष नवनवीन संकल्पनांनी बहरू लागला आहे.
Join Our WhatsApp Community