बॉलिवूडचे रीमेक नव्हेत, हे तर री-डिस्ट्रॉय

सध्या बॉयकॉट बॉलिवूड ही मोहीम जोरात सुरु आहे. सामान्य भारतीय जनतेचा बॉलिवूडवर रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ह्याला बॉलिवूडचे कलाकार जबाबदार आहेत. त्यांनी बर्‍याचदा बहुसंख्य जनतेला दुखावणारी विधानं केली आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये हिंदू विरोधी कंटेंट दाखवले जातात. त्यात बॉलिवूडचा दर्जा देखील घसरला आहे. बॉलिवूडकडे स्वतःचे कंटेंट नसल्यामुळे ते रीमेक बनवत आहेत. एक छान दक्षिण भारतीय क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. नाव आहे फॉरेन्सिक.

( हेही वाचा : गणेश दर्शनाच्यानिमित्ताने राजकारण्यांची संपर्क मोहीम जोरात )

हा चित्रपट बघताना पुढे काय होईल ही उत्सुकता लागलेली असते. महत्वाची गोष्ट म्हणजे या मूळ चित्रपटात उगाच घुसवलेली प्रेम कहाणी नाही, गरज नसताना हीरो रोमॅंटिक चाळे करत नाही. कथा भरकटत नाही आणि दक्षिण भारतीय चित्रपटात होणारे ओव्हर सीन्स नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत आपली उत्सुकता ताणली जाते. मला या चित्रपटाचा शेवटचा सीन मात्र अति-कमर्शियल किंवा दक्षिण भारतीय चित्रपटासारखा वाटला. हे वगळता चित्रपट उत्कृष्ट आहे. आता या गाजलेल्या चित्रपटाचा रिमेक बॉलिवूडला बनवावासा वाटला.

बरं कॉपी पेस्ट करण्याची बुद्धी सुद्धा बॉलिवूडकडे राहिलेली नाही हे मोठे दुःख. हिंदी चित्रपटातील कलाकार चांगले आहेत. विक्रांत मैस्सी आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत आहेत. पण हा टिपिकल बॉलिवूड मसाला सिनेमा आहे. यातला थ्रिल निघून गेल्यासारखा वाटतो. हीरो पहिल्याच सीनमध्ये माकडचाळे करतो, तेही फॉरेन्सिक ऑफिसर असताना. आता बॉलिवुडच्या मते हीरोने पप्प्या घेतल्या पाहिजे, रोमान्स केला पाहिजे म्हणून मूळ चित्रपटाच्या कथेत नसलेली गोष्ट इथे करण्यात आलेली आहे. मूळ चित्रपटात मेन लीड एकमेकांचे दीर आणि वहिनी आहेत.

आता बिचार्‍या बॉलिवूडला प्रश्न पडला असेल की दीर-वहिनी रोमान्स करताना दाखवले तर मिनी-पॉर्न होईल म्हणून प्रेक्षकांवर उदार होऊन त्यांनी दोघांना प्रियकर-प्रेयसी म्हणून दाखवलं. त्यामुळे हीरोला रोमान्स करायची मुभा मिळाली आणि ही सर्व कटकट होत असताना मूळ कथा भरकटली. बॉलिवूडने बनवलेला अतिशय बालिश रीमेक होता हा. हीच आमीर खानच्या तर्‍हा लाल सिंह चड्डा आणि अक्षय कुमारची कटपुतलीची झाली आहे. त्यामुळे बॉलिवुडने बनवलेले रीमेक पाहुन असं वाटतं की कदाचित त्यांनी शपथ घेतली असावी की सर्व मूळ चित्रपटाची आम्ही ऐसी-तैसी करणार आहोत. म्हणूनच म्हणावसं वाटतं की बॉलिवूडने बनवलेले हे रीमेक नसून, री-डिस्ट्रॉय आहे. बॉलिवूडमध्ये आता धिंगाणा उरलेला आहे, कला मात्र मृत अवस्थेत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here