दुबईहून एका प्रवाशाला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. या प्रवाशाने डोकं लावून तब्बल १.१७ वजनाचे सोने कॅप्सूल पॅकेटमध्ये लपवले होते.
कित्येकदा भारतात विदेशातून सोने, मौल्यवान वस्तू, ड्रग्ज आणून त्याची छुप्या मार्गाने विक्री केली जाते. असे गैरप्रकार टाळण्यासाठी विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाते. आज, सकाळी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक मोठी कारवाई केली आहे.
(हेही वाचा – नागपूरप्रमाणे नाशिकमध्ये ‘या’ मार्गावर होणार डबलडेकर उड्डाणपूल!)
मिळालेल्या माहितीनुसार, सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेन्स युनिट अर्थात एआययूने दुबईहून येणाऱ्या एका प्रवाशाला कोची विमानतळावर अडवले. त्याने शरीरामध्ये चार कॅप्सूल पॉकेट लपवून ठेवले होते. ते अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या कॅप्सूल आकाराच्या पॅकेजमध्ये १.१७ किलो वजनाचे ४८ लाख रूपये किंमतीचे सोने मिळून आले आहे.
Join Our WhatsApp CommunityAir Intelligence Unit (AIU) of the Customs Department intercepted a passenger coming from Dubai at Kochi airport today morning and seized gold weighing 1.17 kg worth Rs 48 lakhs concealed inside his body in four capsules shaped packets: AIU, Customs Kochi pic.twitter.com/qismJ55AE9
— ANI (@ANI) December 19, 2022