CVC Report: केंद्रीय तपास यंत्रणेतील 171 प्रकरणांमध्ये तब्बल 633 अधिकारी भ्रष्ट?

139

15 ऑगस्ट रोजी केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराला मुळापासून उपटून काढण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने काम करत असल्याचे, विधान केले होते. त्यातच आता 2021 या वर्षातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये 600 पेक्षा अधिक अधिकारी तसेच कर्मचा-यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. एकूण 633 अधिकारी या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये अडकले आहेत. सीव्हीसी अर्थात सेन्ट्रल विजलन्स कमिशनच्या रिपोर्टमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षभरात 171 प्रकरणांमध्ये तब्बल 633 केंद्रीय कर्मचारी भ्रष्ट्राचारात अडकले आहेत.

अहवालात काय? 

  • वर्षभरात केंद्रीय कर्मचा-यांविरोधात भ्रष्टाचाराची एकूण 171 प्रकरणे
  • 171 प्रकरणांमध्ये तब्बल 633 केंद्रीय कर्मचा-यांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
  • 633 पैकी 75 प्रकरणातील बहुतांश अधिकारी सीबीआयचे
  • 633 पैकी 65 प्रकरणांत 325 अधिका-यांवर भ्रष्टाचाराचा आरोप
  • सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील 67 अधिका-यांविरोधातील 12 प्रकरणे प्रलंबित
  • रेल्वे मंत्रालयातील 30 अधिका-यांशी संबंधित 11प्रकरणे प्रलंबित
  • 2021 या वर्षातील भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याचा आरोपांशी निगडीत सरकारी अधिका-यांच्या संख्येत वाढ

( हेही वाचा: ‘सागर’ बंगल्यावर राज ठाकरे-फडणवीसांची खलबतं, तासभरची चर्चा गुलदस्त्यात )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.