तौकाते वादळाचा महाराष्ट्रासह या राज्यांना बसणार तडाखा

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार, लक्षद्वीप परिसर आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रालगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. लक्षद्वीप येथे 15 तारखेच्या पहाटे तो अधिक तीव्र होऊन, त्यानंतरच्या 24 तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळाला तौकाते असे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून याबाबतची माहिती दिली आहे.

इथे कोसळणार वादळी वा-यासह पाऊस

हे तौकाते वादळ आणखी तीव्र होऊन, उत्तर-वायव्य दिशेने गुजरात आणि त्याच्या बाजूच्या पाकिस्तान किनारपट्टीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे लक्षद्वीप, केरळ, गुजरात, महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक व तामिळनाडू येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लक्षद्वीप- 13-16 मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

केरळ- 13-16 मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा- 15 ते 17 मे दरम्यान  येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुजरात- हे वादळ 18 मे रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात 18 मे रोजी तर दक्षिण-पश्चिम राजस्थान येथे 19 मेला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

कर्नाटक- 13 मे रोजी हलक्या सरी आणि 14 मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15,16 व 17 मे रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तामिळनाडू- 14 मे रोजी संततधारा आणि 15 मे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

काय आहे तौकातेचा अर्थ?

म्यानमारद्वारे या वादळाला तौकाते असे नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ हल्ला चढवणारी पाल असा होतो. या चक्रीवादळाच्या इशारा देत केरळमधील मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here