अमेरिकेच्या ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ११ ते १५ मे दरम्यान मान्सूनपूर्व चक्रीवादळ (Cyclone) तयार होण्याची शक्यता आहे. मोचा नमक हे वादळ बांगलादेशसह ओडिशात धडकण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Unseasonal Rain : मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचा इशारा)
ग्लोबल फोरकास्ट सिस्टीमने सांगितल्यानुसार बंगालच्या उपसागरात ५ ते ११ मे दरम्यान चक्रीवादळाची (Cyclone) निर्मिती होण्याची शक्यता आहे. ५ मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान विभागानुसार, काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात असणाऱ्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याचे आयएमडीने सांगितले आहे.
हेही पहा –
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मध्यरात्रीनंतर ११ मे ते १३ मे दरम्यान चक्रीवादळ (Cyclone) म्यानमारच्या राखीव राज्य आणि बांगलादेशच्या चट्टोग्राम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या किनारपट्टीला 150 ते 180 किमी/ताशी वाऱ्याचा संभाव्य वेग आहे, पण तो भारताच्या ओडिशा राज्याच्या किनारपट्टीलाही धडकू शकते. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा उगम झाल्यास त्याला ‘मोचा’ असं नाव देण्यात येईल.
Join Our WhatsApp Community