मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यात जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. ही घटना सोमवारी दुपारच्या वेळात घडली. खेरवाडी पोलीस ठाण्यात सिलिंडरचा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. ती आग विझवताना एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना सायन येथील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा स्फोट कसा झाला याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
(हेही वाचा – पुन्हा होणार नोटबंदी! भाजप खासदाराने का केली २ हजारांची नोट बंद करण्याची मागणी?)
काय आहे प्रकरण
मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील खेरवाडी पोलीस ठाण्यातील एका खोलीत सोमवारी दुपारी ही घटना १२.३० वाजेच्या सुमारास घडली. त्यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद खोत यांनी ही आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत. ही घटना लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सायन रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेले साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये हा सिलिंडरचा स्फोट झाला. मात्र याला कोणताही अधिकृत दुजोरा पोलिसांकडून देण्यात आलेला नाही.
Join Our WhatsApp Community