सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र पोलिसांनी बुधवारी 4 जानेवारी रोजी पालघर जिल्हा न्यायालयात दाखल केले. हे आरोपपत्र 152 पानाचे असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले. कासा पोलिसांनी बुधवारी शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅक्टर अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध चार्शिट दाखल केले, अपघाताच्यावेळी त्या गाडी चालवत होत्या.

( हेही वाचा: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; मंदिर प्रशासनाची माहिती )

4 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सूर्या नदी ओव्हरब्रीजजवळ झालेल्या मर्सिडीज बेंझ कारच्या या अपघातात सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला होता. डहाणू सत्र न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, दुपारी 2:34 वाजता हा अपघात झाला तेव्हा अनाहिता गाडी चालवत होत्या, असे सुमारे पाच साक्षीदारांच्या जबाबातून समोर आले आहे. अनाहिता अजूनही दुखापतीतून ब-या होत असल्याचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here