पुलाच्या सदोष डिझाईनमुळे मिस्त्री यांच्या वाहनाला अपघात?

151

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी असलेला उड्डाण पूल हा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला आहे, त्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता अपघातग्रस्त वाहनांचे ऑडिट करणाऱ्या फॉरेन्सिक पथकाने वर्तवली आहे. महाराष्ट्र पोलीस आणि राज्य परिवहन विभागाने नियुक्त केलेल्या तपास पथकाने मात्र गाडीचा वेग जास्त असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली अपघाताची चौकशी

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडिज बेन्ज वाहनाला पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या चारोटी पुलाजवळ रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री हे जागीच ठार झाले, या आपघातानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली असून हा अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला, याचा तपास सुरु करण्यात आलेला आहे. या तपासासाठी अपघातग्रस्त वाहनाचे ऑडिट करण्यासाठी सेव्ह लाइफ फाऊंडेशनद्वारे फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात आलेले असून या पथकात सर्व अनुभवी व्यावसायिक आहेत आणि त्यात आयआयटी खारागपूरचे दोन पीएचडी झालेले मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनीअर आणि सिम्युलेशन आणि मॉडेलिंगमध्ये माहिर असलेली एक व्यक्ती या पथकात आहे. अपघातग्रस्त मोटारीची स्थिती आणि प्राणघातक जखमांवरून स्पष्टपणे असा निष्कर्ष निघतो की वाहन अतिवेगात होते, असे सूत्राकडून समजते.

(हेही वाचा बाळासाहेबांच्या सून स्मिता ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटल्या)

सीट बेल्ट आहे त्या स्थितीत होते

अपघाताच्या वेळी सायरस आणि जहांगीर पांडोळे यांनी सीट बेल्ट घातला नव्हता, असा निष्कर्ष काढण्यात आला, त्यामागाचे कारण म्हणजे अपघाताच्या वेळी सीट बेल्ट बांधले गेले असते, तर त्यावर खुणा (थोडे ओरखडे) झाले असते, आम्हाला सीट बेल्ट योग्य स्थितीत आढळले आणि ते आहे त्या स्थितीत होते, अशी माहिती समोर येत आहे. अपघाताची चूक शोधण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तपास पथकातील सात सदस्यीय फॉरेन्सिक पथकाने अशी शक्यता वर्तवली आहे की, मर्सिडीज-बेंझ या मोटारीचा अपघात पुलाच्या ‘सदोष डिझाइन’मुळे झाला, तर मागील सीटवर बसलेल्यांनी सीटबेल्ट न घातल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला.

अचूक वेग निश्चित करण्यासाठी सॉफ्टवेअर सिम्युलेशन आणि मॉडेलिंग

मात्र यावर अद्याप अधिकृत शिक्कमोर्तब झालेले नसले तरी लवकरच तपास पथकाचा हा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीजचे एक पथक या अपघाताचा तपास करीत असून लवकरच त्यांचा अहवाल देखील शासनाकडे सादर केला जाईल. महाराष्ट्र पोलीस आणि राज्य परिवहन विभागाने नियुक्त केलेल्या तपास पथकाने मात्र गाडीचा वेग जास्त असल्याचा निष्कर्ष काढला असला तरी वाहनाचा अचूक वेग निश्चित करण्यासाठी सॉफ्टवेअर सिम्युलेशन आणि मॉडेलिंग करत असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.