उद्योगक्षेत्रात लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या संभाळणारे सायरस मिस्त्री कोण होते?

130

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातात निधन झाले. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने भारतीय उद्योग जगताला मोठा धक्का बसला. सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पालनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र. २०१९ साली सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाच्या प्रमुखपदाची सूत्रे सांभाळली होती. परंतु त्यांचे आणि रतन टाटा यांच्याशी वाद झाले त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. अवघ्या २३ व्या वर्षी मेस्त्री यांनी व्यवसायात प्रवेश करून मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली.

शिक्षणापासून ते उद्योजक असा आहे मिस्त्री यांचा प्रवास

प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणारे सायरस मिस्त्री हे भारतीय उद्योग जगतातील एक मोठे नाव. भारतीय वंशाच्या सर्वात यशस्वी आणि शक्तिशाली व्यावसायिकांपैकी एक असलेले, पालनजी मिस्त्री यांच्या नेतृत्वात, भारत, पश्चिम आशिया आणि आफ्रिका अशा देशांमध्ये बांधकाम व्यावसायाचे साम्राज्य पसरले. त्यांच्या मुलांसोबत त्यांची टाटा सन्समध्ये १८.५ टक्के हिस्सेदारी आहे. सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. त्यांनी लंडनमधील इम्पिरियल महाविद्यालयातून सिव्हील इंजीनिअरिंग आणि बीएसचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. सायरस मिस्त्री यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या २३व्या वर्षी सन १९९१ मध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाच्या पालनजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९४ मध्ये शापूरजी पालनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सायरस मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली शापूरजी पालनजी कंपनीने अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले. मिस्त्री यांचा विवाह प्रसिद्ध वकील इक्बाल छागला यांची कन्या रोहिका छागला यांच्याशी विवाह झाला. सायरस मिस्त्री यांना दोन सुपुत्र आहेत. सन २००६ साली सायरस मिस्त्री हे टाटा समुहाचे सदस्य बनले. पुढे २०१३ साली वयाच्या ४३ व्या वर्षी ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. परंतु, शापूरजी पालनजी या उद्योग घराण्याचे वारसदार असलेले मिस्त्री यांचा ऑक्टोबर २०१६ मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१२ साली त्यांनी टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. पुढे फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांना टाटा सन्सच्या संचालक पदावरून तसेच समूहातील अन्य कंपन्यांवरून काढून टाकण्यात आले होते. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टीविरोधात मिस्त्री यांनी मार्च २०१७ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई पीठाकडे दावा दाखल केला होता. जुलै २०१८ मध्ये न्यायाधिकरणाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला. त्यावर ऑगस्ट २०१८ मध्ये अपील न्यायाधिकरणाकडे मिस्त्री यांनी धाव घेतली होती. न्यायमूर्ती एस.जे. मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय अपील न्यायाधिकरणाने जुलैमध्ये दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण केले आणि १८ डिसेंबरला अंतिम निकाल दिला. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष हे मूळ पद पुन्हा बहाल केले जावे, असे सांगून न्यायाधिकरणाने एन. चंद्रशेखर यांची त्या जागी केली गेलेली नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली होती. टाटांना या निकालाविरोधात अपिलासाठी चार आठवड्यांचा कालावधीही अपील न्यायाधिकरणाने बहाल केला होता. त्यानुसार टाटा सन्सकडून सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.