भारतावर हल्ला करण्यासाठी रशियाकडून मागवला होता मोठा शस्त्रसाठा!

भारतावर हल्ल्यासाठी डी-कंपनीने मागवले होते रशिया कडून एके - ४७ रायफल्स

भारतावर हल्ला करण्यासाठी डी-कंपनीने एजंटमार्फत रशिया या देशातून तब्बल ४० एके-४७ रायफल्स मागवल्या होत्या. परंतु ऐनवेळी या एजंटने डी-कंपनी सोबतच करार रद्द करून एके-४७ देण्यास नकार दिला असल्याचा खुलासा दाऊदच्या पुतण्याच्या साथीदार दानिश अहमद याने मोक्का न्यायालयात आपल्या जबाबात केला आहे.

डी-कंपनीचा गँगस्टर छोटा शकील आणि दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याने रशियन गुप्तचर एजंटला ४० एके-४७ रायफल खरेदीची ऑर्डर दिली होती, पण या शस्त्रांचा वापर मुंबई आणि काश्मीरवर हल्ल्या करण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती एजंटला मिळाल्यानंतर हा करार होऊ शकला नाही, असे दाऊदच्या पुतण्याच्या एका जवळच्या साथीदाराने गुरुवारी मुंबईतील मोक्का न्यायालयासमोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

दाऊदच्या पुतण्याच्या साथीदार दानिशने काय म्हटले…

दानिशने अंडरवर्ल्ड मधील तपशीलवार माहिती देताना सांगितले की, त्याने त्याच्या मोठ्या भावाचा मित्र कुलदीप जैबलिया यांच्यासोबत काम सुरू केले. दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ नूरा इब्राहिम, नूराचा मुलगा सोहेल, कुलदीपच्या माध्यमातून त्यांचा मॅनेजर अल्ताफ यांच्याशी माझी ओळख झाली. सोहेलने माझी ओळख त्याच्या काका अनीस इब्राहिमशी करून दिली, असे तो म्हणाला. पुढे त्याने असे सांगितले की, त्यावेळी त्याच्याकडे फारसे काम नसल्याने त्याने अनिससाठी अर्धवेळ काम करायला सुरुवात केली. “मी भारतीय हिरे व्यावसायिक आणि त्यांच्या खात्याची माहिती मिळवायचो आणि ती रशियन एजंटला पाठवायचो. या माहितीच्या बदल्यात तो मला रशियातून बेकायदेशीरपणे हिरे वाहतूक करण्यास मदत करायचा. त्या एजंटने मला त्याच्यासाठी दुर्बीण, बुलेटप्रूफ जॅकेट, शस्त्रे इत्यादी पुरवठ्यात काम करण्यास सांगितले,” असे दानिशने त्याच्या निवेदनात म्हटले आहे.

२००९ मध्ये, नूराच्या मृत्यूनंतर, सोहेल दानिशच्या जवळ आला होता, त्याने नंतर रशियन एजंट्सच्या ऑफरवर चर्चा केली, ही माहिती सोहेलने काका अनिस यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर अल्ताफने दाऊदचा जवळचा साथीदार छोटा शकील आणि जबीर मोतीवाला यांच्याशी माझी ओळख करून दिली. मोतीवाला यांनी रशियन एजंटमार्फत शस्त्रास्त्रे आणि इतर वस्तूंच्या पुरवठ्यासंदर्भात त्यांच्या कडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती.

(हेही वाचा – Alert! तुमच्या वाहनाचं PUC आहे का? नसेल तर…)

सुमारे २ महिन्यांनंतर छोटा शकीलने त्याला ४० एके- ४७ रायफल्सची ऑर्डर दिली. दानिशने असा दावा केला आहे, त्याने सांगितले की, जेव्हा त्याने रशियन एजंटला ऑर्डर दिली तेव्हा त्याने अनिस, शकील आणि टोळीतील सर्व सदस्यांबद्दल अधिक माहिती घेतली. रायफल खरेदी करण्यामागील हेतू काय आहे याची माहिती एजंटने मागवली होती, ही शस्त्रे मुंबई आणि काश्मीरमध्ये वापरली जाणार असल्याची माहिती रशियन एजंटला मिळाली. त्यानंतर त्याने शस्त्रे पुरविण्याचा करार रद्द करून आम्ही शस्त्रे पाठवू शकत नाही असे सांगितले होते, असे दानिश याने आपल्या निवेदनात म्हटले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here