जसा हा खून झाला, तेव्हापासूनच प्रसारमाध्यमे, राजकारणी यांनी निवाडा त्याच दिवशी दिला होता. त्यामुळेच अधिकाऱ्यांना योग्य दिशेने तपास करता आला नाही, असे आम्हाला वाटते, अशी स्पष्टोक्ती दाभोलकर हत्या प्रकरणातील (Dabholkar Murder Case) आरोपींचे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर (Prakash Salsingikar) यांनी केली. ते निकालानंतर माध्यमांशी बोलत होते.
(हेही वाचा – Dabholkar murder case प्रकरणी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे निर्दोष; शरद कळसकर आणि सचिन अंधुरे दोषी)
१० मे रोजी पुणे येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर प्रकाश साळसिंगीकर यांनी या प्रकरणातील विसंगतींवर प्रकाश टाकला.
हजारो पानांच्या आरोपपत्रात आरोपींविरोधात एकही पुरावा नाही
अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर म्हणाले की, साक्षीदारांनी फोटोवर लिहिले होते की, हेच आरोपी आहेत. तरी त्या आरोपींना पकडण्यात आले नाही. ही थिअरी चालली नाही. त्यानंतर तिसरी थिअरी आली की, हत्या शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांनी केली. तीही चाललेली नाही. पहिल्यापासून हा खटलाच चालवू दिलेला नाही. अगदी २ महिने आधीच सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती की, ही केस चालू द्या. हजारो पानांच्या आरोपपत्रात आरोपींविरोधात एकही पुरावा नव्हता. त्यामुळेच ही केस चालू दिली जात नव्हती. आता न्यायालयाने तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. (Dabholkar Murder Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community