Dadasaheb Phalke – भारतीय चित्रपटाचे जनक

दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० साली महाराष्ट्रातील त्र्यंबक येथे चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.

208
Dadasaheb Phalke - भारतीय चित्रपटाचे जनकv
Dadasaheb Phalke - भारतीय चित्रपटाचे जनक

धुंडिराज गोविंद फाळके हे भारतातले पाहिले चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांना दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) या नावाने ओळखलं जातं. ते भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जातात.

त्यांनी १९१३ साली भारतातला पहिला आणि पूर्ण लांबीचा चित्रपट प्रदर्शित केला होता. राजा हरिश्चंद्र असं त्या चित्रपटाचं नाव होतं. आपल्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पूर्ण लांबी असलेले ९५ चित्रपट आणि २७ लघुपट तयार केले होते. त्यांपैकी मोहिनी भस्मासुर, सत्यवान सावित्री, श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन हे गाजलेले चित्रपट आहेत.

भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या अंतर्गत दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या सन्मानार्थ चित्रपट सृष्टीतला सर्वोत्तम सन्माननीय पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचं नाव दादासाहेब फाळके पुरस्कार असं आहे.

(हेही वाचा – BMC SWD : महापालिकेच्या फसवणुकीचा प्रयत्न, कंत्राटदाराविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर)

दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचा जन्म ३० एप्रिल १८७० साली महाराष्ट्रातील त्र्यंबक येथे चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गोविंद सदाशिव फाळके असं होतं. त्यांना लोक दाजीशास्त्री या नावाने ओळखायचे. ते संस्कृत भाषेचे विद्वान होते. तसेच ते हिंदू पुजारी म्हणूनही काम करायचे. दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या आईचं नाव द्वारकाबाई असं होतं. त्या गृहिणी होत्या.

दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचं प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेश्वर येथे झालं. त्यानंतर मुंबईत त्यांनी मॅट्रिक पूर्ण केली आणि १८८५ साली त्यांनी जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स येथे ऍडमिशन घेतलं. तिथे त्यांनी एक वर्षाचा चित्रकलेचा कोर्स पूर्ण केला.

(हेही वाचा – Baba Ramdev: पतंजलीच्या १४ औषधांवर बंदी, उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाची कारवाई)

मग ते बडोद्याला महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीतील कला भवनात ललित कलाशाखेत कामाला लागले. तरीही त्यांनी नव्या गोष्टी शिकणं कधीच थांबवलं नाही. १९९० साली त्यांनी ऑइल पेंटिंग्ज आणि वॉटर कलर पेंटिंग्जचा कोर्स पूर्ण केला. मग त्यांनी मॉडेलिंग आणि आर्किटेक्चरमध्येही प्राविण्य मिळवलं.

त्याच वर्षी दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी एक कॅमेरा विकत घेतला. त्यासोबत त्यांनी फोटोग्राफीची आणि फोटोप्रिंटची प्रोसेस करण्यासाठी प्रयोग करायला सुरुवात केली. असेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगांनंतर त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय चित्रपट सृष्टीतला पहिला चित्रपट तयार झाला होता, राजा हरिश्चंद्र…

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.