Dadasaheb Torane : फाळके नव्हे, तर दादासाहेब तोरणे होते भारतीय चित्रपटाचे आद्य प्रवर्तक! आपल्याला त्यांचा विसर का पडला?

325
Dadasaheb Torane : फाळके नव्हे, तर दादासाहेब तोरणे होते भारतीय चित्रपटाचे आद्य प्रवर्तक! आपल्याला त्यांचा विसर का पडला?
Dadasaheb Torane : फाळके नव्हे, तर दादासाहेब तोरणे होते भारतीय चित्रपटाचे आद्य प्रवर्तक! आपल्याला त्यांचा विसर का पडला?
रामचंद्र गोपाळ तोरणे उपाख्य दादासाहेब तोरणे (Dadasaheb Torane) यांचा जन्म १३ एप्रिल १८९० रोजी पश्चिम भारतीय कोकण किनारपट्टीवरील मालवण गावात झाला. लहानपणी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या काकांनी त्यांना आणि त्यांच्या आईला घर सोडण्यास सांगितले. त्यामुळे त्यांचे बालपण गरिबीत गेले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली आणि ते मुंबईला गेले. (Dadasaheb Torane)
पुढे त्यांनी कॉटन ग्रीन इलेक्ट्रिकल कंपनीत नोकरी केली. तिथे ते इलेक्ट्रिकल इंस्टॉलेशन (Electrical installation) आणि इन्स्ट्रुमेंट दुरुस्ती (Instrument Repair) करायला शिकले. पुढे त्यांचा संपर्क श्रीपाद थिएटर कंपनीशी झाला. या कंपनीची नाटके आणि मुंबईत प्रदर्शित होणारे नवीन परदेशी चित्रपट पाहून ते खूप प्रभावित झाले. मग विशीतल्या या तरुणाला स्वतःचा चित्रपट बनवण्याची इच्छा निर्माण झाली. श्री. चित्रे यांच्यासोबत त्यांनी परदेशातून रॉ फिल्म आणि मूव्ही कॅमेरा आयात केला आणि श्री पुंडलिक या पहिल्या भारतीय चित्रपटाचे शूटिंग केले.  (Dadasaheb Torane)
हा पहिला भारतीय चित्रपट १८ मे १९१२ रोजी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर, दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा दुसरा भारतीय चित्रपट ३ मे १९१३ रोजी त्याच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पुंडलिक मुंबईतील त्याच चित्रपटगृहात सुमारे दोन आठवडे चालला. चित्रपटाकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक छान जाहिरात देण्यात आली, “मुंबईच्या निम्म्या लोकांनी हा चित्रपट पाहिलाआहे, आता उरलेल्या लोकांनीही पाहावा.”  (Dadasaheb Torane)
तोरणे यांचा पुंडलिक २२ मिनिटांचा होता तर फाळकेंचा राजा हरीश्चंद्र ४४ मिनिटांचा होता. पुढे त्यांनी अनेक मूक, हिंदी, मराठी चित्रपट निर्माण केले. मात्र यातील बहुतेक चित्रपट आणि त्यांच्या एकमेव प्रती आगीत भस्मसात झाल्या. त्यांनी पुण्यात एक स्टुडिओ बांधला होता, जो चाकण ऑईल मिल यांना विकून टाकला. आज तिथे कुमार पॅसिफिक मॉल उभा आहे. १९४७ मध्ये ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना त्यांच्या मुस्लिम सहकाऱ्याने आणि मित्राने चित्रपटातील सर्व कॅमेरे आणि इतर महागडी उपकरणे चोरून पाकिस्तानात नेली.  (Dadasaheb Torane)
मैत्री पुढे धार्मिक कट्टरता जिंकली. यामुळे त्यांना हादरा बसला आणि १९४७ मध्ये त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या आईने त्याला या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली. मात्र त्यांची कारकीर्द संपुष्टात आली होती. १९ जानेवारी १९६० रोजी सकाळी झोपेतच त्यांचे निधन झाले. ज्या माणसाने भारतीय चित्रपटाचा पाया रचला, त्याचा अंत अतिशय वाईट झाला आणि आज तर ते विस्मृतीत गेलेले आहेत. दादासाहेब तोरणे यांचं नाव आज किती लोकांना माहिती आहे? (Dadasaheb Torane)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.