…आणि ‘हिंदू डॉन’ झाला ‘आमदार’!

गवळीने ज्या दगडी चाळीतून गुन्हेगारीला सुरुवात केली, त्याच दगडी चाळीतून अरुण गवळीने समाजसेवेचा वसा हाती घेऊन राजकारणात प्रवेश केला. 

201

दगडी चाळ अरुण गवळीसाठी एक घर होतं तर चाळीतील रहिवासी त्याच्या कुटुंबाचा एका भाग बनले होते. चाळीतील रहिवाशांसाठी त्याने चॅरिटेबल क्लिनिक, मुले आणि तरुणांसाठी आखाडा, व्यायामशाळा उभ्या केल्या होत्या. या व्यायाम शाळेसाठी अत्याधुनिक उपकरणे मागवली होती. चाळीच्या आतमध्ये एक गोशाळा बांधली. अरुण गवळी हा देवभक्त असल्यामुळे देवदर्शनाने त्याच्या दिवसाची सुरुवात होत होती. पुढे त्याने चाळीतच मंदिरे बांधली, या मंदिरात आज देखील पूर्वीप्रमाणेच पूजा अर्चना करण्यात येते. रहिवाशांच्या अडचणीला अरुण गवळी आणि त्याचे कुटुंब सतत धावत असे चाळकऱ्यांना हवे नको ते पुरवण्याची जवाबदारी अरुण गवळीने स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. अरुण गवळीने ज्या दगडी चाळीतून गुन्हेगारीला सुरुवात केली, त्याच दगडी चाळीतून अरुण गवळीने समाजसेवेचा वसा हाती घेऊन राजकारणात प्रवेश केला.

(हेही वाचाः डॅडींच्या दगडी चाळीचा ‘इतिहास’! (भाग-1))

दगडी चाळीतील नवरात्रोत्सव

भायखळ्यातील दगडी चाळीचा नवरात्रोत्सव हा मुंबईच नाही, तर आजूबाजूच्या शहरांतील लोकांसाठी एक आकर्षण होते. दगडी चाळीतील नवरात्रोत्सव बघण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईच्या कानाकोप-यातून लोक येत असतात. दगडी चाळीतील देवीची सुरेख मूर्ती, येथील रोषणाई हे येथील आकर्षण आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे येथील उत्सवाला स्वतः अरुण गवळीची उपस्थिती असायची. त्यामुळे अरुण गवळीला एकदा जवळून बघता येईल, म्हणून अनेक तरुण मंडळी येथील नवरात्रोत्सव बघण्यासाठी येत होती.

(हेही वाचाः …आणि ‘दगडी चाळ’ बनली गवळीचे साम्राज्य!)

मुंबई गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा देवीचा उत्सव अश्विन नाईक याच्या प्रतिस्पर्धेत सुरू करण्यात आला होता. अश्विन नाईक नवरात्रोत्सव साजरा करत असल्यामुळे, त्याला शह देण्यासाठी या उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. दगडी चाळीच्या नवरात्रोत्सवात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. या ठिकाणी गुन्हे शाखेच्या पोलिसांची साध्या वेशात गवळीच्या हालचालीवर बारीक नजर असते. तसेच या उत्सवात कुठल्याही प्रतिस्पर्धी टोळीकडून गैरप्रकार होऊ नये, तसेच उत्सवाला गालबोट लागू नये, म्हणून मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येतो.

गवळीचा राजकारणात प्रवेश

गवळीने अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना करुन राजकारणात प्रवेश केला. शंभो नारायण म्हणत गवळीच्या या पक्षात हजारो तरुणांनी प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यात अखिल भारतीय सेनेच्या शाखा उभ्या राहिल्या. या समाजसेवेच्या कामात गवळीला त्याच्या पत्नीची चांगलीच साथ मिळाली. दगडी चाळ हा गवळीचा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्यातूनच या पक्षाचे समाजकारण सुरू झाले. दगडी चाळ ते काळा घोडा येथे अखिल भारतीय सेनेने काढलेल्या एका रॅलीत हजारो तरुणांचा सहभाग बघून अनेक राजकीय नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती.

(हेही वाचाः ‘ती’ घटना घडली आणि दगडी चाळीची ‘दहशत’ निर्माण झाली!)

अरुण गवळीने विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरु केली होती. त्यासाठी त्याने चाळीतच ५ हजार चौरस फूट खोलीत कार्यालय थाटले होते. एक लिफ्ट तयार केली होती, ती लिफ्ट केवळ गवळीच्या मुलाखती घेण्यासाठी येणाऱ्या विदेशी पत्रकारांसाठी होती.

अखेर २००५ मध्ये अरुण गवळी आमदार म्हणून निवडणून आला.

(हेही वाचाः दगडी चाळीचे पोलिसांनी सांगितलेले किस्से)

समाप्त…
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.