देशभरात गोपाळकालाचा उत्साह पाहायला मिळत असून मुंबईत जागो-जागी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा करत सरकारी नोकऱ्यांमध्ये गोविंदाना ५ टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या घोषणेसह दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
(हेही वाचा – दहीहंडीला खेळाचा दर्जा! पुढील वर्षापासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा; मुख्यमंत्र्यांची घोषणा)
आज, शुक्रवारी दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.
दहीहंडी उत्सवाला आता खेळाचा दर्जा
दहीहंडी या धार्मिक उत्सवाला आता खेळाचा दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून गुरूवारी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार पुढील वर्षापासून आता ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर ‘प्रो दहीहंडी’ हा खेळ सुरु होणार आहे.
गोविंदाना विमा संरक्षण मिळणार
दहीहंडी उत्सवातील गोविंदाना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहीहंडी उत्सवात जर कोणत्या गोविंदा पथकाचा मृत्यू झाल्यास १० लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्या गोविंदाना ७ हजार ५० लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पायाला दुखापत झालेल्या किंवा जखमी झालेल्यांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community