मुंबईतील नानावटी रुग्णालयात मागच्या दोन दिवसांपासून मृत्यूशी झूंज देणा-या गोविंकाचा मृत्यू झाला आहे. संदेश दळवी असे या गोविंदाचे नाव आहे. संदेश दळवी हा शिव शंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. दहिहंडीच्या दिवशी तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र यांनी दिली.
विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना संदेश 7 व्या थरावरुन खाली कोसळला. मुंबईतील कूपर रुग्णालयात दोन दिवस तो दाखल होता. 7 व्या थरावरुन खाली कोसळल्यामुळे त्याच्या मानेला आणि मेंदुला जबर दुखापत झाली होती. त्याचा मृत्यू झाला आहे. संदेश आई- वडिल आणि आपल्या भावंडांसह राहत होता. संदेश सर्वात लहान. मुळचा पार्लेकर पण सध्या तो कुर्ल्यात राहत होता. घरात सर्वांत लहान असल्याने तो आई- वडिलांसह सर्वांचाच लाडका होता. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
( हेही वाचा: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर; 24 तासांत दुस-यांदा बदलली तारीख )
आयोजकांवर गुन्हा दाखल
दहिहंडीत डोक्याला मार लागून गोविंदा जखमी झाल्याने, आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता. विलेपार्ले पूर्व येथे वाल्मिकी चौक येथे रियाज शेख याने दहिहंडीचे आयोजन केले होते. मात्र गोविंदा पथकाच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही काळजी न घेता साधनसामग्री पुरवली नाही. यावेळी विनय शशिकांत रांबाडे, संदेश प्रकाश दळवी, हे दोन गोविंदा दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
Join Our WhatsApp Community