दिल्लीत डेंजर झोन! ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता?

नेपाळमधील ५.४ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के दिल्लीसह उत्तर भारतात शनिवारी जाणवले. आठवडाभरापूर्वीही दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. आतापर्यंत दिल्लीत आलेल्या भूकंपाचे धक्के धोकादायक नव्हते परंतु तज्ज्ञांच्या मते आणि सरकारच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, दिल्लीवर मोठ्या भूकंपाचा धोका वर्तवण्यात आला आहे.

दिल्ली एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करण्यासाठी तयार आहे का? 

तज्ज्ञांच्या मते दिल्लीत केव्हाही ७ ते ७.९ रिश्टर स्केला तीव्रतेचा भूंकप येऊ शकतो. या तीव्रतेच्या भूकंपामुळे राजधानीवर मोठा परिणाम होऊ शकतो. २०१५ मध्येही भूंकपामुळे नेपाळमध्ये हाहाकार झाला होता. त्या भूकंपाची तीव्रता ७.८ एवढी होती परंतु दिल्ली एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करण्यासाठी तयार आहे का असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

दिल्लीसह उत्तराखंडच्या पिथौरागढ, बागेश्वर, टिहरी आणि रुद्रप्रयागमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरमधील फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, हापूर येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, याआधी मंगळवारीही दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. त्यावेळीही नेपाळ हे भूकंपाचे केंद्र होते. यावेळी डोटी जिल्ह्यात घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here