मुंबईत होणाऱ्या रस्ते अपघाताचे डेंजर झोन मुंबई वाहतूक नियंत्रण शाखा आणि ब्लुमबर्ग फिलांथ्रोपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी या संस्थेने मुंबई रस्ते सुरक्षा अहवाल २०२० मध्ये नमूद केले आहे. पूर्व उपनगरात सर्वाधिक डेंजर झोन असून मागील तीन वर्षांत १२३ जणांना या ठिकाणी अपघातात आपला जीव गमवावा लागला असल्याचे वाहतूक विभागाच्या वार्षिक अहवालातून समोर आले आहे.
तीन वर्षांत ३८३ जणांचा मृत्यू
घाटकोपर माहुल रोड (छेडा नगर जंक्शन), पूर्व द्रुतगती महामार्ग गोदरेज सिग्नल, घाटकोपर उड्डाणपूल, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, एलबीएस रोड हे पूर्व उपनगरातील सर्वाधिक अपघाताचे ठिकाण आहे. तर पश्चिम उपनगरातील वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मालाड मार्वे रोड, अंधेरी कुर्ला रोड असे एकूण मुंबईतील १५ ठिकाणे सर्वाधिक धोकादायक म्हणून अहवालात नमूद करण्यात आलेली आहे. या १५ डेंजर झोनमध्ये २०१८ ते २०२० या तीन वर्षांत ३८३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १ हजार ३०० जण जखमी झाले आहे.
(हेही वाचा प्रेयसीसाठी काय पण! भावी डॉक्टरानं केलं असं काही अन् गेला गजाआड…)
डेंजर झोनमधील रात्री ८ ते १० ची सर्वाधिक घातक
मुंबई वाहतूक विभागाच्या अहवालानुसार मागील तीन वर्षांची आकडेवारी पहाता सर्वात जास्त अपघात रात्री ८ ते १० या दोन तासात झालेले आहेत. या दोन तासांच्या कालावधीत १२६ जणांचा अपघाती मृत्यू झाला असून २४८ जण जखमी झालेले आहेत व अपघाताची संख्या ५०४ आहेत.
हे आहेत मुंबईतील अपघातांचे १५ डेंजर झोन
१) सायन-पनवेल महामार्ग, २) रामकृष्ण चेंबूरकर, ३) पूर्व द्रुतगती महामार्ग, ४) मालाड मार्वे रोड, ५) घाटकोपर मानखुर्द लिंक, ६) आदी शंकराचार्य मार्ग, ७) अंधेरी-कृर्ला रोड, ८) एलबीएस रोड, ९) रफी अहमद किडवाई, १०) घाटकोपर-माहुल मार्ग, ११) घाटकोपर उड्डाणपूल, १२) अाशा नगर रोड, १३) वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स, १४) पश्चिम द्रुतगती महामार्ग, १५) जनरल ए. के.वैद्य मार्ग
Join Our WhatsApp Community