उस्मानाबादमधील उरुसात चेंगराचेंगरी; 14 भाविक जखमी

216

उस्मानाबादमधील उरुसात वळू उधळल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेत 14 भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उस्मानाबाद शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे (Dargah Hazrat Khwaja Shamsuddhin Gazi Rehmatulla Alaihi ) यांच्या उरुसाच्या धार्मिक कार्यक्रमावेळी अचानक वळू उधळला आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. पहाटे घडलेल्या घटनेत 14 भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात (Osmanabaf District Government Hospital) उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: भूकंपग्रस्त तुर्कीत 10 भारतीय अडकले, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती )

कोणतीही जीवितहानी नाही

पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते, अचानक वळू उधळल्याने मोठी धावपळ झाली आणि नागरिक भयभीत होऊन पळू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण 14 भाविक जखमी झाले आहेत. पोलीस आणि वैद्यकीय पथक तत्काळ हजर झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.