Daryapati Shivray : छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन

132
Daryapati Shivray : शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा 'दर्यापती शिवराय' प्रदर्शन
Daryapati Shivray : शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा 'दर्यापती शिवराय' प्रदर्शन

अखंड हिंदुस्थानचे दैवत, महाराष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंपैकी हिंदुस्थानी नौदलाचे जनक अशीही महाराजांची ओळख आहे. महाराजांच्या अतुलनीय आरमाराची यशोगाथा म्हणजेच ‘दर्यापती शिवराय’ (Daryapati Shivray) हे प्रदर्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिक्हलमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Art Festival) 9 ते 12 जानेवारीला दादरमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे.

हेही वाचा-MTDC ची पर्यटनस्थळांवरील सर्व निवासस्थाने फुल्ल

फेस्टिव्हलचे हे चौथे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातील गडकिल्ले, शस्त्रास्त्र, शिल्पकला, खाद्य संस्कृती आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन मुंबईकरांना घडत आले आहे. या विविधतेबरोबरच यावेळी ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शनात शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती, सागरी किल्ल्यांचे अप्रतिम छायाचित्रे, इंग्रजांना शह देणाऱ्या मराठ्यांच्या खांदेरी युद्धाची प्रतिकृती, मराठयांची आरमारी शस्त्र आणि बरेच काही या प्रदर्शनात पाहता येणार आहे. (Daryapati Shivray)

हेही वाचा-Akkalkot Accident : अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 4 ठार, 7 जखमी

दादर पश्चिमेतील स्वातंत्र्यवीर साकरकर मार्गाजवळील वनिता समाज हॉलमध्ये हे प्रदर्शन भरणार असून सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले आहे. या प्रदर्शनासाठी श्री शिवराजाभिषेक दीपोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. (Daryapati Shivray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.