नामिबियातून भारतात आलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू!

114

नामिबियातून 22 डिसेंबर 2022 रोजी भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. या चित्त्याचा मृत्यू किडनीच्या आजारामुळे झाल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानाने लेखी निवेदन जारी करण्यात आले आहे.

( हेही वाचा : आताच उरका बॅंकांची कामे! एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाच दिवस सुट्ट्या )

या निवेदनानुसार नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या ‘साशा’ नामक मादी चित्ताला तातबडतोब उपचारांची गरज आहे असे निरीक्षण पथकाला वाटले. त्यानुसार तिला क्वारंटाइन क्षेत्रात आणण्यात आले. यानंतर तिच्या रिक्ताची चाचणी करण्यात आली. यामध्ये धक्कादाक बाब समोर आली ती म्हणजे साशाला किडनीला संसर्ग झाला होता. पण तिला भारतात आणण्यापूर्वीच संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर साशाची मेडिकल हिस्ट्री देखील तपासण्यात आली, यामध्ये असे आढळून आले की, 15 ऑगस्ट 2022 रोजी नामिबियात तिची शेवटची रक्ताची चाचणी करण्यात आली यामध्ये रक्तात क्रियेटिनिनचे प्रमाण 400 पेक्षा अधिक आढळून आले होते. यामुळं हे स्पष्ट झाले की, शाशाला किडनीचा आजार हा भारतात आणण्यापूर्वीच जडला होता. पण डॉक्टरांकडून साशाला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करुनही अपयश हाती आले. सोमवारी 27 मार्च 2023 रोजी अखेर तिचा मृत्यू झाला.

नामिबियातून पहिल्या खेपेत भारतात आणण्यात आलेल्या उर्वरित चित्त्यांमध्ये 3 नर आणि 1 मादी खुल्या जंगलामध्ये स्वच्छंदी विहार करत आहेत. त्यांचे आरोग्य उत्तम असून ते सामान्यपणे शिकारही करत आहेत. तसेच दुसऱ्या खेपेत दक्षिण अफ्रिकेतून आणलेले 12 चित्ते सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असून त्यांची प्रकृती देखील उत्तम आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.