पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी? एका प्रवाशाचा मृत्यू

180

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीनिमित्त अनेक जण आपापल्या गावी जात आहेत आणि त्यामुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.

काय घडला प्रकार

पुणे रेल्वे स्थानकावर रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास एक नंबरच्या फलाटावर पुण्याहून दानापूरच्या दिशेने जाणारी गाडी आली. गाडी येताच स्थानकावरील प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच गर्दी केली. त्यातच एक प्रवासी खाली पडला. परंतु, खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्याऐवजी लोक त्याला चेंगरून रेल्वेत चढले. यावेळी त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

(हेही वाचा – दिवाळी विशेष गाड्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; वाचा संपूर्ण यादी)

मृत्यू झालेला प्रवासी अगोदरच आजारी होता. त्यात त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. रेल्वे स्थानकावरील झालेल्या चेंगरा चेंगरीमध्ये या प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पुणे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.