पुण्याला जाताय? उद्या ‘ही’ एक्स्प्रेस असणार रद्द

111

ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान पाचवी व सहावी मार्गिकेच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी १८ तासाचा ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहे. रद्द करण्यात आलेल्या गाडीत पुण्याहून सुटणारी पुणे-मुंबई डेक्कन व डेक्कन क्वीन एक्स्प्रेस याचा देखील समावेश आहे. त्यामुळे रविवारी या दोन गाड्या धावणार नाहीत. तसेच मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस देखील रद्द केली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळी ८ वाजता ब्लॉकला सुरुवात

रविवारी सकाळी ८ वाजता ब्लॉकला सुरुवात होणार आहे. रविवारी मध्य रात्री दोन वाजता हा ब्लॉक संपणार आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर देखील होणार आहे. शनिवार १८ डिसेंबर रोजी धावणारी हुब्बल्ली-दादर एक्स्प्रेस ही दादरला न जाता पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. त्यामुळे १९ डिसेंबरला ही गाडी पुण्याहून सुटणार आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी म्हणाले… UP+YOGI, बहुत है उपयोगी’)

ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही शॉर्ट टर्मिनेट

रविवारी या दोन एक्सप्रेस धावणार नसल्याने प्रवाशांना प्रवासासाठी पर्याय शोधावा लागणार आहे. रविवारी १८ तासाचा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मुंबईत होणाऱ्या ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.