असं म्हणतात की, काही तारखा आपल्यासोबत इतिहास घेऊन येतात. 13 डिसेंबर 2001 ही तारीखही इतिहासात नोंदवली गेली. भारतीय लोकशाहीला हादरवून सोडणारी ही तारीख. आजच्याच दिवशी दहशतवाद लोकशाहीच्या मंदिरापर्यंत पोहोचला. संपूर्ण देश सुन्न होता, संसदेवर हल्ला कसा काय होऊ शकतो ? असा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत होता. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस म्हणून या दिवसाची नोंद झाली. आज 20 वर्ष लोटल्यानंतरही भारताच्या अस्मितेवर झालेल्या या हल्ल्याचे घाव आजही कायम आहेत.
I pay my tributes to all those security personnel who were martyred in the line of duty during the Parliament attack in 2001. Their service to the nation and supreme sacrifice continues to inspire every citizen.
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021
भारताचे दुर्दैव
गोळ्यांचा आवाज, हातात एके-47 घेऊन संसदेच्या आवारात धावणारे दहशतवादी, भरकटलेले सुरक्षा कर्मचारी, इकडून तिकडे धावणारे लोक, असे संसद भवनाचे दृश्य होते. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण प्रत्येक चित्र खरे होते आणि हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव होते.
श्रध्दांजली अर्पण करणार
13 डिसेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसद भवनाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणार्या हुतात्म्यांना सोमवारी देश श्रद्धांजली अर्पण करणार आहे. संसद भवनात हुतात्मांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. संसदेवर झालेल्या या हल्ल्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि याशिवाय पाच दहशतवादीही मारले गेले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता देशासाठी आपल्या प्राणांची आहूती देणा-या जवानांना देश सलाम करतो.
( हेही वाचा: दिलासादायक! आता फोडणी हेणार स्वस्त…)