आता राजीनामा दिला तरी तो मागे घेता येणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. २००५ सालानंतर सरकारी सेवेत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक निर्णय दिला असून या निर्णयानुसार, सरकारी नोकरीचा राजीनामा त्यांना आता कधीही मागे घेता येणार आहे. तर या निर्णयाचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला तरी त्यांना आता तो मागे घेता येणार आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या अटी असतील, याबाबतचे आदेशदेखील राज्य सरकारने सोमवारी जारी केले आहे.

(हेही वाचा – तुम्ही सरकारी कर्मचाऱी आहात? मग तुम्हाला मिळणार हा लाभ)

काय आहेत निकष

दरम्यान, १ नोव्हेंबर २००५ सालानंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणी राजीनामा दिल्यास तो मागे घेण्यासंबंधीचे सुस्पष्ट धोरण आतापर्यंत नव्हते. ज्या कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत नाही, अशा कर्मचाऱ्यांचा राजीनामा मागे घेण्यासंबंधीचे धोरण आता निश्चित करण्यात आले आहे. यानुसार या सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला त्यांचा राजीनामा त्यांना कधीही मागे घेता येणार आहे. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याने पुन्हा सेवेत घेण्याची विनंती केली असल्यास ती स्वीकारण्याचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्याने त्याची सचोटी, कार्यक्षमता किंवा वर्तणूक याशिवाय अन्य काही कारणास्तव राजीनामा दिलेला असला पाहिजे. ज्या कारणाने त्याने राजीनामा दिला, त्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा बदल झाल्यामुळे त्याने राजीनामा मागे घेण्याची विनंती केलेली असली पाहिजे. राजीनामा अंमलात येण्याची तारीख आणि तो मागे घेण्याबद्दल विनंती केल्याची तारीख यांच्या दरम्यानच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्याची वर्तणूक कोणत्याही प्रकारे अनुचित असता कामा नये, असे नियम निश्चित करण्यात आले आहेत.

असे आहेत नियम

  • एखाद्या कंपनीत किंवा सरकारी नियंत्रणाखालील किंवा सरकारी अनुदानावरील संस्थेत रुजू होण्यासाठी शासकीय सेवेचा राजीनामा दिलेला असेल तर तो मागे घेतला जाणार नाही.
  • राजीनामा अंमलात येण्याची तारीख आणि तो मागे घेण्यास परवानगी दिल्यामुळे त्या व्यक्तीला कामावर रुजू होण्यास मुभा दिल्याची तारीख यांच्या दरम्यानचा अनुपस्थितीचा कालावधी ९० दिवसांपेक्षा अधिक असता कामा नये.
  • राजीनामा दिल्याने रिक्त झालेले पद राजीनामा परत घेतल्यानंतर रिक्त असणे आवश्यक असणे गरजेचे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here