गेट वे ऑफ इंडिआचे सौंदर्य खुलणार!

गेटव वे ऑफ इंडिया हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. रोजच्या रोज हजारो, लाखो पर्यटक याठिकाणी येतात. येथून जवळच्या अलिबाग, एलिफंटा, तसेच विविध पर्यटनस्थळी बोटीने जाता येते. त्यामुळे या परिसरात रोज मोठ्या संख्येने पर्यटकांची ये-जा असते. या पार्श्वभूमीवर या परिसराचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

(हेही वाचा – 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दुसऱ्यांदा वाढ होणार!)

पर्यटकांच्या दृष्टीने अधिक आकर्षक करण्यात येणार

गेटव वे ऑफ इंडिया हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या मुख्य भागाची, तसेच घुमटाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. दुरूनही दिसणारे हे घुमट गेट वे ऑफ इंडियाची शान आहे. या घुमटाच्या दुरुस्ती तसेच सौंदर्यीकरणासह याठिकाणी विविध सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. गेटव वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवण्याच्या दृष्टीने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार अरविंद सावंत, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून विविध कल्पना विचारात घेण्यात आल्या आहेत.

७५ फूट उंचीचा ध्वज उभारणार

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा परिसर आकर्षक करून, येथे ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ७५ फूट उंचीचा ध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सुरक्षारक्षकांची केबिन, स्वच्छतागृह, जुने वैभव दर्शविणारे पथदिवे, परिसराची माहिती देणारे फलक, रस्त्याच्या दुभाजकांवर लहान ध्वज लावण्यासाठी खांबांची रचना आदी सुधारणा देखील करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here