राज्यातील रुग्ण संख्या कमी होत असताना आता केवळ पुणे जिल्ह्यांतील कोरोनाची संख्या हजारांपुढे कायम आहे. गेल्या आठवड्यात अहमदनगर, नागपूर आणि आता मुंबईतही कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या हजारांच्या खाली उतरली आहे.
पुण्यात आताही २ हजार ५४१ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारपासून हजारांच्या खाली आलेल्या मुंबईत ८३८ कोरोनाचे रुग्ण उरलेत. तर राज्यात रविवारी नोंदवल्या गेल्या नव्या रुग्णांची संख्या ७८२ वर होती.
(हेही वाचा – रशिया-युक्रेन युद्ध: तिसऱ्या महायुद्धाची नांदी?, वाचा ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत)
तिस-या लाटेच्या प्रभावी काळात मुंबई, ठाणे,पुणे, नाशिक,रायगड, अहमदनगर, नागपूर या जिल्ह्यांत रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र आता या जिल्ह्यांतील काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या पाचशेच्याही खाली उतरल्या आहेत.
कोरोना रुग्णांची सक्रीय संख्या
रायगड – १९३
नागपूर – ३७३
नाशिक – ४०६
ठाणे – ५५८
अहमदनगर – ६४५
मुंबई – ८३८
पुणे – २ हजार ५४१
- राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या – ४ हजार ६२९
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९८.०३ टक्के
- राज्यातील मृत्यूदर – १.८२ टक्के