१२ लाख दिव्यांनी लख्ख झाली ‘रामनगरी’

उत्तर प्रदेशातील अयोध्या रामनगरीत आज बुधवारी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दीपोत्सव सकाळपासून सुरू झाला असून यामध्ये १२ लाख मातीच्या पणत्या लावण्यात येत आहे. त्यामुळे आज रामाची नगरी म्हणून ओळख असलेल्या अयोध्येत १२ लाख पणतीच्या रोषणाई लख्ख होताना दिसतेय. रामनगरीत आजच्या दीपोत्सव २०२१ च्या माध्यमातून एका नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. अयोध्येत १२ लाख दिव्यांच्या रोषणाईची नोंद आणि मोजणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त दिव्यांची संख्या

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासूनच अयोध्येत रामाच्या चरणी ९ लाख दिवे प्रज्वलित करण्यात सुरूवात झाली आहे. रामजन्मभूमी परिसरात ५१ हजार दिवे, प्राचीन मंदिरं आणि इतर ठिकाणी ३ लाखांहून अधिक दिवे लावण्यात येत आहे. इतकेच नाही तर अयोध्येशिवाय बस्ती जिल्ह्यातील माखोडा धामसह ८४ कोसी परिक्रमेत येणाऱ्या अनेक ठिकाणी दिवे प्रज्वलित करण्यात येत आहे. अयोध्येत यंदा लावल्या जाणाऱ्या दिव्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्याचे सांगितले जातेय. सकाळी १० वाजता प्रभू रामाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. तसेच राज्यपाल आनंदी बेन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हजर होते. या कार्यक्रमात राम-सीतेचे हेलिकॉप्टरने आगमन, भरत मिलाप, रामायण चित्र प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करण्यात आले.

(हेही वाचा -बापरे! केंद्राने रद्दीतून केली ४० कोटींची कमाई!)

यंदाचा दीपोत्सव भव्य स्वरूपात

२०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची स्थापना झाल्यानंतर अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. पहिल्या वर्षी १ लाख ८० हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. २०१८ मध्ये ३ लाख १ हजार १५२, तर २०१९ मध्ये ५ लाख ५० हजार आणि २०२० मध्ये ५ लाख ५१ हजार आणि यंदा २०२१ हे योगी सरकारच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा दीपोत्सव भव्य स्वरूपात साजरा होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here