Diwali 2022: दिवाळीच्या फटाक्यांमुळे ‘हे’ शहर ठरले जगातले सर्वात प्रदूषित शहर

185

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात दिवाळीच्या दिवशी जगातील प्रदूषणाची राजधानी ठरली आहे. प्रदूषणाची पातळी आधीच वाढलेली असताना दिवाळीच्या दिवशी जगातील सर्वात प्रदूषित शहर दिल्ली ठरल्याचे समोर आले आहे. दिवाळीनिमित्त दिल्लीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळतो. दिल्लीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची अतिषबाजी झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणाला मंत्रिपद मिळणार?; मुख्यमंत्री म्हणाले…)

स्विस संस्थेच्या IQAir ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहेत. यानंतर पाकिस्तानचे लाहोर दुसऱ्या स्थानावर आहे. 2018 मध्ये दिल्लीने 281 AQI नोंदवले होते तर दिवाळीत दिल्लीचा AQI 312 वर होता.

दरम्यान, गाझियाबादमध्ये AQI 301, नोएडामध्ये AQI 303, ग्रेटर नोएडामध्ये AQI 270, गुरूग्राममध्ये AQI 325 आणि फरिदाबादमध्ये AQI 256 अशी दिल्लीच्या आजूबाजूच्या शहरांची स्थिती होती. हिवाळी सुरू झाला की देशातील मोठ्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खराब होऊ लागली आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका राजधानी दिल्लीला बसतो, जिथे हवा अशाप्रकारे विषारी होते की, लोकांना श्वास घेणे कठीण होते. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळेही हवेतील प्रदूषण देखील झपाट्याने वाढते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.