कुतुबमिनारमध्ये हिंदू-जैन यांना पूजेसाठी ‘नो एंट्री’

75

कुतुबमिनार परिसरात हिंदू आणि जैन देवतांच्या मूर्तींचे अभिषेक आणि पूजा करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी दिल्ली न्यायालयात दिवाणी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत हिंदू आणि जैन धर्मियांच्या मूर्ती पूजेला परवानगी नाकारली आहे.

याचिकेतून करण्यात आली विनंती

कुतुबमिनार परिसरात हिंदू आणि जैन देवतांच्या मूर्तींचे अभिषेक आणि पूजा करण्याचा अधिकार दिला जावा, अशी ऍड. विष्णू एस.जैन यांनी याचिकेतून केली होती. केंद्र सरकारला एक ट्रस्ट बनवण्यासाठी आणि कुतुब परिसरातील मंदिर परिसर व्यवस्थापन आणि प्रशासन त्यांच्याकडे सोपवण्यासाठी ट्रस्ट कायदा 1882 नुसार अनिवार्य आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली होती.

म्हणून फेटाळली याचिका

याचिकेनुसार मोहम्मद घोरीच्या सैन्यातील सेनापती कुतुबुद्दीन ऐबकने 27 मंदिरे अर्धवट पाडली आणि त्यातील सामग्री पुन्हा वापरून आवारात कुव्वत-उल- इस्लाम मशीद बांधली गेली. याचिकेत म्हटले आहे, की 27 मंदिरांचे प्रमुख देवता, ज्यात प्रमुख देवता तीर्थंकर भगवान ऋषभ देव आणि प्रमुख देवता भगवान विष्णू, भगवान गणेश, भगवान शिव, देवी गौरी, भगवान सूर्य, भगवान हनुमान यांचा समावेश आहे. त्या परिसरात प्रतिष्ठापना व पूजा करण्याचा अधिकार आहे, असे याचिकेत नमूद आहे. दरम्यान न्यायालयाने भूतकाळातील चुकांना आधार मानून वर्तमान आणि भविष्यातील शांतता बिघडवू शकत नसल्याचे सांगत सदर याचिका फेटाळून लावली.

 ( हेही वाचा: गांगुलीचा मोठा खुलासा, कोहलीला दिला होता सल्ला, मात्र…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.