डिव्हायडरवर झोपलेल्या सहा जणांना ट्रकने चिरडले; चौघांचा मृत्यू, दोघे जखमी

दिल्लीमधील सीमापुरी भागात बुधवारी रात्री ट्रक अंगावरुन गेल्याने चौघांचा मृत्यू झाला असून, 2 जण गंभीर जखमी आहेत. दुभाजकावर पीडित झोपलेले असताना ट्रकने त्यांना चिरडले. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे. चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. चौघांना उपचारासाठी तत्काळ जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी एकाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला, तर एका व्यक्तीने उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला.

( हेही वाचा: महापालिकेविरोधात याचिका दाखल; ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव )

ट्रक चालकाचा शोध सुरु

सीमापुरी भागात रात्री 1 वाजून 51 मिनिटांच्या सुमारास काही लोक दुभाजकावर झोपलेले असताना भरधाव वेगात असणा-या अज्ञात ट्रकने त्यांना चिरडले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत. दोघांचा घटनास्थळी तर तिस-याचा रुग्णालयात जाताना आणि चौथ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांकडून सध्या ट्रकचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. याप्रकणी गु्न्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here