दिल्लीत इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये भीषण आग

दिल्लीत इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. भागीरथी पॅलेस इलेक्ट्राॅनिक मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अग्नीशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. संबंधित परिसर दाटीवाटीचा असल्याने आग विझवण्याच्या कामात अडथळा येत आहे.

ज्या ठिकाणी आग लागली आहे. ते मार्केट पूर्णपणे इलेक्ट्राॅनिक वस्तूंचे आहे. आग नेमकी का लागली ते सध्या तरी समजू शकलेले नाही. पण आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे.

( हेही वाचा: ‘सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही’, फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले )

आगीची घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. परिसरात धुरांचे साम्राज्य निर्माण झाले. या दरम्यान, आगीत इलेक्ट्राॅनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. इलेक्ट्राॅनिक वस्तूंना आग लागल्याने आग आणखी भडकली आणि पाहतापाहता संपूर्ण मार्केट परिसरावर आगीने ताबा मिळवला. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आग लागली त्यावेळी मार्केट बंद होते, अशी देखील माहिती समोर आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here